Wednesday, November 6, 2013

यश

देव जरी अवतरला पृथ्वीवर,
करू शकणार नाही एक गोष्ट पुरी.
दिवस दिवस काम करून पण,
मिळतात फक्त हातावर तुरी.

सांगताना सगळेच म्हणतात तूच आमचा हिरो.
शेवटी देऊन जातात परीक्षेत मिळणारा झिरो .

काय करावे जास्त असे काही,
ज्यामुळे होईल आपल्यासाठी दररोज दिवाळी?
सोडून द्या सगळ्या आशा आता,
नको होळी वा ती पुरणाची पोळी.

याचा समाचार चांगलाच घेतला जाईल,
या नाहीतर त्या टोकातून प्रत्येक जण पाहिल.

राहिलं कुठे हे गुपीत आता,
जगजाहीर जे झालं आधीपासून.
तुमचा पराक्रम आहे सर्वाना माहित,
नाही लपला कोणा एका पासून.

कधीतरी डोक्यात प्रकाश पडेल त्यांच्या,
कधीतरी माझ्या बळकावतील माझ्या आशा.

भावनांचा उद्रेक होईल एवढा मोठा,
की राहणार नाही कोणीही गाफील.
येईल हातात यश लगेच माझ्या
की ही राख सुद्धा आपली छाप सोडील.

द्यावाच लागेल माझ्या हातात ताबा सर्व गोष्टींचा,
कोणी नाही राहत या जगात वीना एका यशाचा. 

Wednesday, March 28, 2012

पाय होते कुठे आम्ही गेलो कुठे?

पाय होते कुठे आम्ही गेलो कुठे?
त्या दूर समुद्राला सोडून आलो इथे.

वाट मनातली पायांनी ओळखली कशी?
चिमुकल्या पायांना ती समजली जशी.


काय हरवले ह्या खुणांना पाहून?
जे मनात होते तेच आले डोळ्यात दाटून.

पायवाट ही कधी बनलीच नसती,
ह्या खुणांना ती सापडलीच जर नसती.


डोक्यातली ती जाग आलीच कुठून?
हृदयातली ही स्पंदने येतात तिथून.

स्वप्न वेड्या मानाने हे पाहिलेच का?
डोक्यात हा कसा पेटलाच दिवा.

जाईन त्याच वाटेने जिथे नेईल ही हवा,
गेले ते दिवस, राहिली फक्त पाठलाग करणारी ती दिशा.


आणीन ते दिवस गेले त्या वाटेने ते,
त्यांनाच पुन्हा दिसेल नवा सूर्य वर्तमानात जगतात जे.

Sunday, January 1, 2012

नवी नव्याची नवलाई...

नमस्कार,

सर्वात पहिले तर सगळ्याना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तसं हे मराठी नवीन वर्ष नाही पण आज काल तर सगळीकडे फॅडच झालंय या गोष्टीचं.. "थर्टीफस्टला काय करणार आहेस?" असा प्रश्न सर्वांच्या तोंडी असतोच नेहमी...


किती जरी संकल्प सोडले ३१ डिसेंबरला तरी ते पुढच्या ३१ डिसेंबरपर्यंत राहतीलच असे बिलकुल नाही,  आता हा विषय तसा थोडा दिलखुलास  बोलण्यासारखा आणि त्यावर पुन्हा भांडण्यासारखा आहे , विषय जरी काहीही असला तरी जो काही त्याचा मतितार्थ  आहे तो आपण समजून घेतला पाहिजे ना...


गोंधळलात? मी या  पोस्टच्या  टायटल विषयी बोलत आहे, म्हणजे  नवी नव्याची नवलाई...काहीही केले आपण तरी ती गोष्ट फक्त काही दिवस मनात राहते नंतर त्या गोष्टीकडे आपले हमखास दुर्लक्ष होते...


मी या वर्षी माझ्या घरी नांदेड मध्ये दिवाळी साजरी केली नेहमीप्रमाणे... जेव्हा मला समजले की मी पुन्हा नांदेड मध्ये नवीन वर्ष साजरे करण्यास जाणार आहे तेव्हा फार आनंद झाला कारणं, मटार च्या शेंगा खात  नवीन वर्षाचे स्वागत, प्रशांत दामलेंच्या मराठी प्रोग्रामना पाहात करावे आणि नवीन वर्ष्याची संध्याकाळ एन्जोय करावी असा प्लान होता... जे लहानपणी करत आलो ते पुन्हा करायला मिळणार ... :)  


तसे पूर्णपणे नाही झाले, पण काही फरक पडत नाही.... किती वेळा आपण गोष्टी  ठरवतो  आणि त्या पूर्ण  होतात ??


मी यावेळी ३१ डिसेंबरला रात्री ८.३० वाजता झोपलो आणि १ तारखेला सकाळी ८.३० वाजता उठलो ... काही नवीन वाटले  नाही, म्हणजे जे काही आपण आतापर्यंत करत आहोत तसे आत्ता पण करत राहणार... पुन्हा तेच नवी नव्याची नवलाई... :)


थोडासा दुसऱ्या विषयाला हात लावतो,
एका गोष्टीची मला खंत वाटते , जेव्हा केव्हां  मी महाराष्ट्रात येतो तेव्हा अशी इच्छा असते की मी फक्त आणि फक्त मराठी ऐकावे पण इथे लोकांची इच्छाच नाही की त्यांनी मराठीत बोलावे ... लोकांची भलेही मातृभाषा मराठी असेल, मग ते कोणीही असोत हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, जे कोणी महाराष्ट्रात लहानपणा पासून आहेत त्यांना मराठी यायलाच पाहिजे, आणि १००% त्यांना येतेच , तरीही लोक  बोलण्यासाठी  कचकच  करतात...


आता मला कोणत्याही जातीयवादात जायचे नाहीये, पण मी काही दक्षिण भारतातील शहरे पहिली, तिथे कोणताही माणूस जो लहान पणापासून तिथे राहतो तो त्याच्या मातृभाषे शिवाय  दुसरी भाषा कधीच बोलणार नाही, मग भलेही हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, कोणीही असोत...

माझे असे म्हणणे नाही की तुम्ही फक्त मराठीतच बोला, तुम्हाला पाहिजे त्या भाषेत बोला, पण जो तुमच्याशी मराठीत बोलेल त्याच्याशी तरी मराठी मध्ये बोला... मी या गोष्टी ला नाकारणार नाही की मी खुपश्या लोकांना मराठीत बोललो किंवा एखादा पत्ता विचारला तर ते अस्खलित मराठीत बोलले... पण काही लोकांनी ते उर्मटपणे बोलून नाकारले...

मी दोन वर्षापासून Bangalore मध्ये रहात आहे, तिथे कन्नड बोलतात, सगळे लोक म्हणजे कोणताही माणूस असो तो जर समजा कर्नाटकामधे जन्माला असेल तर तो १००% कन्नड बोलेल... मी सुद्धा थोडी थोडी कन्नड भाषा शिकली आहे, आणि कामचलाऊ का होईना पण बोलता येते...

मला मराठी अमराठी वादात पडायचे नाहीये, किंवा त्या गोष्टीचे राजकारण वां भांडवल पण करायचे नाहीये... फक्त साधा सरळ मुद्दा मांडायचा आहे... अशी आशा करतो की तुमच्या पर्यंत माझे नेमके म्हणने पोहोचले असेल...


तर या नवीन वर्षात तुमचे संकल्प पूर्ण होवोत (जर तुम्हाला ते पूर्ण करायचे असतील तर :) )... आयुषात जे काही करत आहात त्यात खुश असाल तर तेच करावे आणि जर नसाल तर जे काही खुश होण्यासाठी करणार आहात त्यात यश मिळो...


धन्यवाद,
निखील जोशी.

Wednesday, September 28, 2011

स्वप्नांच्या पलीकडले विश्व....

सकाळ झाली आणि सूर्य मावळला,
माझी झोप पूर्ण नाही झाली म्हणून तो पण घाबरला.

मनेजरला घरी जाण्याची सुट्टी मागितली,
त्याने लगेच १५ दिवसाची रजा मंजूर केली 

ऑफिसमध्ये जेवायला गेलो आणि सर्व जेवण फुकट भेटले,
ज्याचा वाढदिवस होता त्याला सर्वांचे आशीर्वाद भेटले.

अतिशय अवघड इशु आला, थोडा पाहता पाहता,
क्लायंटने स्वतः ची चूक म्हणून सोडवून टाकला.  

गारडण मध्ये फिरायला गेलो अचानक एक सुंदर पोरगी दिसली,
लगेच माझ्या जवळ येऊन ती तिचा नंबर देऊन गेली.

पिझ्झा मागवला पैसे जास्त काढून ठेवले आणि,
पिझ्झावाला उशिरा आला आणि सगळे पैसे फिटले.

मित्रांबरोबर गप्पा मारता मारता वेळ कशी गेली काही समजलच नाही,
स्वप्नांच्या पलीकडले जग इथेच आहे दुसरीकडे कुठे नाही.

....

लगेच पेकाडात एक लाथ बसली आणि जी अलार्म वाजून पण नव्हती आली,
ढबरयानी मारल्यावर लगेच तरतरी अंगात येते तशी ती जाग आली. 

तेव्हां खरे समजले की स्वप्नांच्या पलीकडे कोणते जग नाही,

सूर्य कोणालाच घाबरत किंवा कोणासाठी थांबत नाही.
कोणताही मनेजर लगेच सुट्टी मंजूर करत नाही.
क्लायंट तर स्वतः ची चूक कधी  मानतच नाही. 
पिझ्झा किंवा जेवण कधीच फुकट भेटत नाही.
कोणतीही सुंदर मुलगी कधीच भाव देत नाही 

राहिली मित्रांची गोष्ट ती कधीच बदलत नाही,
त्यामुळे पुन्हा,
मित्रांबरोबर गप्पा मारता मारता वेळ कशी गेली काही समजलच नाही,
स्वप्नांच्या पलीकडले जग इथेच आहे दुसरीकडे कुठे नाही.

Tuesday, March 15, 2011

पाऊस पडत आहे हो ....

हो आज पाऊस पडत आहे.... पाउस म्हणजे आपल्या जीवनातील एक सुखद अनुभव असतो... सर्वांच्या आयुष्यात एकदातरी असा अनुभव असतोच असतो... 

आज जेव्हा पाऊस पडत होता खूप काही विचार मनात आले होते त्यातील काही इथे मांडत आहे...

एके दिवशी रस्त्याने पावसात कडे कडे ने जाता जाता मला एक छोटा मुलगा दिसला... तो फारच भिजलेला होता, तरी पण खाली पाहून सरळ काहीही झाले नाही असा चालला होता... 

नुकताच शाळेतून आलेला असावा कारण दप्तर पाठीवरच होत.. मुलगा छोटा पण दप्तर फारच जड होते... दप्तर पूर्णपणे भिजले होते पण त्याची काळजी त्याला नव्हती...

आयुष्यात पहिल्यांदाच वर्गातून काढून टाकले असेल असा त्याचा चेहरा बोलत होता.... मी आपलं विचार्फुस करावी म्हणून त्याला विचारले , "काय झालाय रे मुला?? तुला काही प्रोब्लेम आहे का??"

तो म्हणाला, "दादा, माझी आई मला घ्यायला आली होती पण काहीतरी खरेदी करताना मी बाहेर आलो आणि माझा रस्ता चुकला, आता मी काय करू कळत नाहीये..".. त्याच्या छोट्याश्या डोळ्यातून अश्रू फुटले... 

त्याच्या चेहरा पाहून मला त्याची मदत करावी वाटली... मी त्याला एका झाडाखाली पावसापासून वाचवण्यासाठी नेले... तो शांतपणे आला, पण रडताना पण तो  विचारात खूपच बुडून गेला होता... आईवाचून त्याला राहवेना... 

मी विचार केला की आता याला काय बोलावे आणि कुठे घेऊन जावे??

तेवढ्यात माझ्या डोक्यात दिवा पेटला... ह्याला आपण त्याच्या शाळेजवळ घेऊन जावे तिथे त्याची आई वाट पाहत असावी... मी त्याला शाळेचे नाव विचारले, "सेंट थोमास Aquinus school" त्याने उत्तर दिले...

मी म्हणालो ही शाळा तर माझ्या घराबाजुलाच आहे.... पाउस थोडा कमी झाल्यावर मी त्याला घेऊन शाळेच्या दिशेने चालायला लागलो...

त्याची आई शाळे जवळच वोचमान ला विचारात होती... मी तेवढ्यात त्याच्या आईला म्हणालो, "एक मिनिट काकू अहो हा तर तुमचा मुलगा नाही ना ?? " 

त्याची आई निखील निखील करत आली आणि त्याला कडेवर घेतले... 

मला माझे नाव ऐकून फार छान वाटले... मी काकुना म्हणालो की माझे नाव पण निखील आहे... त्या पण खुश झाल्या आणि मला धन्यवाद केला... मग त्यांचा निरोप घेऊन मी निघालो...

त्या दिवशी मला पण पावसात जावंस वाटलं... तेव्हा मनाला फार सुख आणि शांतता वाटली... :)

आयुष्यात किती योगायोग होतात.. नाही???  


असेच काही पावसाचे सुखद अनुभव असतात.... मनाला एक सुखद क्षण देऊन जातात....

लहान असताना मुले पावसाची आतुरतेने वाट पाहतात... त्याची कारणं पण फार आहेत...

एक म्हणजे शाळेला सुट्टी भेटते  दुसरे म्हणजे पावसात मस्तपैकी भिजता येते... "येरे येरे पावसा" हे गाणे म्हणता येते... बाकी कुठलाही विचार मनात नसतो...

घरी आईने मस्त कांदाभजी केली असतात... tv  वर match  चालू  असते सचिन शतक मारत असतो...
अजून काय काय... वा पाउस फारच छान असतो...

पावसामध्ये सर्वाना एक गाणे तर आठवतेच आठवते ... राज कपूर साहेबांचे प्यार हुआं इकरार हुआं....
ते गाणे ऐकून आपण सुद्धा आपल्याला आपली नर्गिस कधी भेटेल याची वाट पाहत असतो...

पण पण पण ... पावसाचे काही  वाईट अनुभव सुद्धा असतात .... आत्ताचाच अनुभव पहा... मुंबई मध्ये २६ जुलै ला जे झालं ते कोणाला तरी वाटलं होतं का??? पण तरीही जीवन हे चालूच राहिलं त्याच्यात कसलाही बदल झाला नाही... आता हे जीवन तर असच चालत राहील, खडतर प्रसंगात सुद्धा आपण खचून न जाता त्याचा एका स्मितहास्याने सामना करत रहावा.

पावसाची मजा लुटत राहावी आपले चांगले प्रसंग आठवत राहावे...

धन्यवाद,
निखील जोशी.

Wednesday, December 8, 2010

एक चाळ... भाग ३


चिंटया ला आठवले की जेव्हा तो वर्गात जात होता तेव्हा त्याने सलीम उर्फ़ छोटा चित्रेश आणि शेरू उर्फ़ मांजा भाई ला पाहिले होते त्याने  या दोन गुंडांबरोबर अजुन  एक चेहरा पाहिला होता पण त्याला तो  आठवत नव्हता... 

चिंटया च्या वडलानी म्हणजे सदाभाऊ नी पण त्याला पाहिले होते...त्याचा चेहरा फारच ओळखीचा वाटत होता... 

इंस्पेक्टर शिंदे सर्व विचारत होते तेवढ्यात खरे काका डोक्याला हात लाऊन म्हणाले " का ह्या अत्र्यानी खोली सोडली? मगच हे सर्व विपरीत घडल ..."

"बरोबर आहे खरे काका त्यानीच हे केल आहे.." चिंटया म्हणाला 

"काय बोलत आहेस चिंटया?" खरे काकानी विचारले..

"अहो काका मी सलीम आणि शेरू बरोबर ज्या माणसाला पाहिल होत तो राजेश होता..." चिंटया उत्तरला...

सर्वांची तोंडे आ वाचून उभी राहिली कारण हां तर सर्वात मोठा धक्का होता...राजेश तर चांगल्या घरातला चांगला मुलगा होता तो असे काम का करेल बर?? सर्वांच्या मनात हाच प्रश्न होता ...

मग इंस्पेक्टर शिंदे नी चिंटयाच्या आणि सदाभाऊच्या मदतीने  सलीम आणि शेरू च्या खोली चा शोध घेतला...

पोलिसांनी trap लाउन सलीम ला पकडले पण शेरू त्या खोलीच्या मागच्या दरवाजातून पसार झाला... इंस्पेक्टर शिंदे नी त्याचा पाठलाग केला आणि शेवटी त्याला पकडले...

राजेश च्या घराचा पत्ता तर सदाभाऊना माहितच होता... राजेशही पकडला गेला...

त्याला केलेल्या तपासात हे निश्पन्न झाले की बेरोजगारी च्या फंद्यातून बाहेर येण्यासाठी त्याने सलीम आणि शेरू ची साथ दिली..

आपले घर जिथे जास्त लोक्वस्ती आहे ते देउया ज्याने तिथे दहशत माजेल असे कारस्थान होते छोटा चितेश आणि मांजा भाई चे....

चिंटया आणि चाळीतल्य़ा सर्वांचे इंस्पेक्टर शिंदेनी आभार मानले आणि ५ लाख रोख बक्षिस चाळीला भेटव्हून दिले... 

घरमालकाला अटक झाल्याने  त्याची बायको चाळी ची मालकिन झाली आणि तिने त्या ५ लाखाच्या बक्षिसाचा चांगला वापर केला...

सर्व चाळ नवी नवेली करुन टाकली... सर्व घराना रंग दिला, पाण्याचा मोठा प्रश्न दूर केला..

आता सदाभाऊना चिंटया वर फार गर्व वाटतो... त्यानी चिंटया च्या वर्गाची फीस पण पूर्ण भरली...
आता कोणीही tanker ची वाट पाहत नाही... 
आता कोणी पण चाळी ला धोक्यात जाऊ देत नाही... सर्व जण गुण्या गोविंदाने रहातात..

वाचल्याबद्दल धन्यवाद,
निखिल जोशी...
ही गोष्ट लिहिन्यामागे माझा मित्र रवि याचा मोठा हात आहे त्याने मला ह्या विषयाबद्दल लिहिण्यास स्पूर्ति दिली..

Monday, December 6, 2010

एक चाळ... भाग २

चिंटया जसा ओरडला सर्वांच्या छातीत धस्स झाल.. मग काय सर्व लोक जिकडे तिकडे पळत सुटले..तिथे खरच बॉम्ब आहे का नाही याची शहानिशा न करताच सर्व जण भाम्भावले...

आता काय करायच कुठे जायच? आधीच मुंबईत  एवढे बॉम्ब ब्लास्ट होत आहेत आता आपण पण त्याच्या आहारी जाणार का? असे प्रश्न सर्वांच्या मनात थैमान मांडत होते... जो तो इकडे तिकडे पळत सुटला होता... चिंटया तर सर्वांच्या पुढे पळत होता...

शेवटी सर्व जण अंगणात जमा झाले...सदाभाऊनि पोलिसाना फ़ोन केला .. पोलिस अर्ध्या तासात हजर झाले...त्यानी घरमालकाला बोलावले आणि विचारले की ह्या दोघाना इथे राहू देण्या आधी ते कुठून आले आहेत याची पड़ताळणी का नाही करुन पाहिली?

खरे काका ओरडले " अरे पैसे भेटल्यावर कोण काय पाहतो? कोणाला वेळ आहे तेवढा? ह्याला पण खाऊ घातले पैसे आणि ह्याला तर पैसे सोडून दुसर काय पाहिजे?"

सदाभाऊनि  पण मध्यस्ती करुन पोलिसाना हे समजाउन सांगीतल की ह्या दोघांची काहीच ओळख नव्हती तरीही घरमालकाने कसे त्याना ठेउन घेतले वगैरे वगैरे...

इंस्पेक्टर शिंदेनी चांगलीच विचार्फुस केली... आणि शेवटी त्यानी घरमालकाला ताब्यात घेतले.. हा पुन्हा सर्वाना धक्का देणारा प्रसंग घडला होता...

इंस्पेक्टर शिंदेनी बॉम्ब squard ला बोलावले आणि बॉम्ब defuse करायला सांगितले..

बॉम्ब defuse झाला आणि सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला...

पोलिसांनी कसून तपास केला... त्या तपासात असे निष्पन्न झाले की सलीम आणि शेरू च्या घरात १०० किलो RDX  आहे आणि... बॉम्ब बनवण्याचे साहित्य... ५० लाख रुपये रोख....

हे ऐकून खरे काकाना तर जवळपास हार्ट attak च आला होता...

सलीम आणि शेरू हे दोघे मोठे गुंड होते छोटा चित्रेश आणि मंजा भाई...

त्यानी हां सगळा प्लान बनवला होता ज्यानी सगळी चाळ बॉम्ब ने उडून जाईल आणि दहशत माजेल...

ह्या प्लान मधे घरमालक पण सामिल होता... घरमालकाला १० लाख रुपये मिळाले होते ज्यानी की तो ही सगळी चाळ उडवून टाकुन सगळी जमीन एक मॉल बांधणा-या माणसाला विकणार होता...

त्यांचा हां सगळा प्लान चिंटयाने आणि त्याच्या छोट्या मित्रानी चांगलाच फसवला... 

इंस्पेक्टर शिंदेनी या सर्व गोष्टीना पकडून दिल्या बद्दल चाळीतल्य़ा लोकाना २ लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले...

तरीही एक गोष्ट राहिलीच होती... छोटा चित्रेश आणि मंजा भाई ला कस पकडायच?? 

सदाभाऊ जिथे ड्राईवर चे काम करत होते, तिथे त्यानी एकदा सलीम ला पाहिले होते... चिंटया ला वर्गात सोडायला जाताना त्यानी सलीम ला पाहिले होते... 

सलीम आणि शेरू चिंटया च्या वर्गालगत एका खोलीत रहात होते...

लगेच चिंटया च्या डोक्यातला दिवा पेटला...

क्रमशः...

Shyamchi Aai (Marathi)