सकाळ झाली आणि सूर्य मावळला,
माझी झोप पूर्ण नाही झाली म्हणून तो पण घाबरला.
मनेजरला घरी जाण्याची सुट्टी मागितली,
त्याने लगेच १५ दिवसाची रजा मंजूर केली
ऑफिसमध्ये जेवायला गेलो आणि सर्व जेवण फुकट भेटले,
ज्याचा वाढदिवस होता त्याला सर्वांचे आशीर्वाद भेटले.
अतिशय अवघड इशु आला, थोडा पाहता पाहता,
क्लायंटने स्वतः ची चूक म्हणून सोडवून टाकला.
गारडण मध्ये फिरायला गेलो अचानक एक सुंदर पोरगी दिसली,
लगेच माझ्या जवळ येऊन ती तिचा नंबर देऊन गेली.
पिझ्झा मागवला पैसे जास्त काढून ठेवले आणि,
पिझ्झावाला उशिरा आला आणि सगळे पैसे फिटले.
मित्रांबरोबर गप्पा मारता मारता वेळ कशी गेली काही समजलच नाही,
स्वप्नांच्या पलीकडले जग इथेच आहे दुसरीकडे कुठे नाही.
....
लगेच पेकाडात एक लाथ बसली आणि जी अलार्म वाजून पण नव्हती आली,
ढबरयानी मारल्यावर लगेच तरतरी अंगात येते तशी ती जाग आली.
तेव्हां खरे समजले की स्वप्नांच्या पलीकडे कोणते जग नाही,
सूर्य कोणालाच घाबरत किंवा कोणासाठी थांबत नाही.
कोणताही मनेजर लगेच सुट्टी मंजूर करत नाही.
क्लायंट तर स्वतः ची चूक कधी मानतच नाही.
पिझ्झा किंवा जेवण कधीच फुकट भेटत नाही.
कोणतीही सुंदर मुलगी कधीच भाव देत नाही
राहिली मित्रांची गोष्ट ती कधीच बदलत नाही,
त्यामुळे पुन्हा,
मित्रांबरोबर गप्पा मारता मारता वेळ कशी गेली काही समजलच नाही,
स्वप्नांच्या पलीकडले जग इथेच आहे दुसरीकडे कुठे नाही.
No comments:
Post a Comment