पाय होते कुठे आम्ही गेलो कुठे?
त्या दूर समुद्राला सोडून आलो इथे.
वाट मनातली पायांनी ओळखली कशी?
चिमुकल्या पायांना ती समजली जशी.
काय हरवले ह्या खुणांना पाहून?
जे मनात होते तेच आले डोळ्यात दाटून.
पायवाट ही कधी बनलीच नसती,
ह्या खुणांना ती सापडलीच जर नसती.
डोक्यातली ती जाग आलीच कुठून?
हृदयातली ही स्पंदने येतात तिथून.
स्वप्न वेड्या मानाने हे पाहिलेच का?
डोक्यात हा कसा पेटलाच दिवा.
जाईन त्याच वाटेने जिथे नेईल ही हवा,
गेले ते दिवस, राहिली फक्त पाठलाग करणारी ती दिशा.
आणीन ते दिवस गेले त्या वाटेने ते,
त्यांनाच पुन्हा दिसेल नवा सूर्य वर्तमानात जगतात जे.
त्या दूर समुद्राला सोडून आलो इथे.
वाट मनातली पायांनी ओळखली कशी?
चिमुकल्या पायांना ती समजली जशी.
काय हरवले ह्या खुणांना पाहून?
जे मनात होते तेच आले डोळ्यात दाटून.
पायवाट ही कधी बनलीच नसती,
ह्या खुणांना ती सापडलीच जर नसती.
डोक्यातली ती जाग आलीच कुठून?
हृदयातली ही स्पंदने येतात तिथून.
स्वप्न वेड्या मानाने हे पाहिलेच का?
डोक्यात हा कसा पेटलाच दिवा.
जाईन त्याच वाटेने जिथे नेईल ही हवा,
गेले ते दिवस, राहिली फक्त पाठलाग करणारी ती दिशा.
आणीन ते दिवस गेले त्या वाटेने ते,
त्यांनाच पुन्हा दिसेल नवा सूर्य वर्तमानात जगतात जे.
