नमस्कार,
सर्वात पहिले तर सगळ्याना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, तसं हे मराठी नवीन वर्ष नाही पण आज काल तर सगळीकडे फॅडच झालंय या गोष्टीचं.. "थर्टीफस्टला काय करणार आहेस?" असा प्रश्न सर्वांच्या तोंडी असतोच नेहमी...
किती जरी संकल्प सोडले ३१ डिसेंबरला तरी ते पुढच्या ३१ डिसेंबरपर्यंत राहतीलच असे बिलकुल नाही, आता हा विषय तसा थोडा दिलखुलास बोलण्यासारखा आणि त्यावर पुन्हा भांडण्यासारखा आहे , विषय जरी काहीही असला तरी जो काही त्याचा मतितार्थ आहे तो आपण समजून घेतला पाहिजे ना...
गोंधळलात? मी या पोस्टच्या टायटल विषयी बोलत आहे, म्हणजे नवी नव्याची नवलाई...काहीही केले आपण तरी ती गोष्ट फक्त काही दिवस मनात राहते नंतर त्या गोष्टीकडे आपले हमखास दुर्लक्ष होते...
मी या वर्षी माझ्या घरी नांदेड मध्ये दिवाळी साजरी केली नेहमीप्रमाणे... जेव्हा मला समजले की मी पुन्हा नांदेड मध्ये नवीन वर्ष साजरे करण्यास जाणार आहे तेव्हा फार आनंद झाला कारणं, मटार च्या शेंगा खात नवीन वर्षाचे स्वागत, प्रशांत दामलेंच्या मराठी प्रोग्रामना पाहात करावे आणि नवीन वर्ष्याची संध्याकाळ एन्जोय करावी असा प्लान होता... जे लहानपणी करत आलो ते पुन्हा करायला मिळणार ... :)
तसे पूर्णपणे नाही झाले, पण काही फरक पडत नाही.... किती वेळा आपण गोष्टी ठरवतो आणि त्या पूर्ण होतात ??
मी यावेळी ३१ डिसेंबरला रात्री ८.३० वाजता झोपलो आणि १ तारखेला सकाळी ८.३० वाजता उठलो ... काही नवीन वाटले नाही, म्हणजे जे काही आपण आतापर्यंत करत आहोत तसे आत्ता पण करत राहणार... पुन्हा तेच नवी नव्याची नवलाई... :)
थोडासा दुसऱ्या विषयाला हात लावतो,
एका गोष्टीची मला खंत वाटते , जेव्हा केव्हां मी महाराष्ट्रात येतो तेव्हा अशी इच्छा असते की मी फक्त आणि फक्त मराठी ऐकावे पण इथे लोकांची इच्छाच नाही की त्यांनी मराठीत बोलावे ... लोकांची भलेही मातृभाषा मराठी असेल, मग ते कोणीही असोत हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, जे कोणी महाराष्ट्रात लहानपणा पासून आहेत त्यांना मराठी यायलाच पाहिजे, आणि १००% त्यांना येतेच , तरीही लोक बोलण्यासाठी कचकच करतात...
आता मला कोणत्याही जातीयवादात जायचे नाहीये, पण मी काही दक्षिण भारतातील शहरे पहिली, तिथे कोणताही माणूस जो लहान पणापासून तिथे राहतो तो त्याच्या मातृभाषे शिवाय दुसरी भाषा कधीच बोलणार नाही, मग भलेही हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन, कोणीही असोत...
माझे असे म्हणणे नाही की तुम्ही फक्त मराठीतच बोला, तुम्हाला पाहिजे त्या भाषेत बोला, पण जो तुमच्याशी मराठीत बोलेल त्याच्याशी तरी मराठी मध्ये बोला... मी या गोष्टी ला नाकारणार नाही की मी खुपश्या लोकांना मराठीत बोललो किंवा एखादा पत्ता विचारला तर ते अस्खलित मराठीत बोलले... पण काही लोकांनी ते उर्मटपणे बोलून नाकारले...
मी दोन वर्षापासून Bangalore मध्ये रहात आहे, तिथे कन्नड बोलतात, सगळे लोक म्हणजे कोणताही माणूस असो तो जर समजा कर्नाटकामधे जन्माला असेल तर तो १००% कन्नड बोलेल... मी सुद्धा थोडी थोडी कन्नड भाषा शिकली आहे, आणि कामचलाऊ का होईना पण बोलता येते...
मला मराठी अमराठी वादात पडायचे नाहीये, किंवा त्या गोष्टीचे राजकारण वां भांडवल पण करायचे नाहीये... फक्त साधा सरळ मुद्दा मांडायचा आहे... अशी आशा करतो की तुमच्या पर्यंत माझे नेमके म्हणने पोहोचले असेल...
तर या नवीन वर्षात तुमचे संकल्प पूर्ण होवोत (जर तुम्हाला ते पूर्ण करायचे असतील तर :) )... आयुषात जे काही करत आहात त्यात खुश असाल तर तेच करावे आणि जर नसाल तर जे काही खुश होण्यासाठी करणार आहात त्यात यश मिळो...
धन्यवाद,
निखील जोशी.