Friday, November 19, 2010

पुन्हा केमिकल लोचा...

केमिकल लोचा ... हा तर असा शब्द आहे की सर्वानाच  आवडतो... कारण मुन्ना भाई ला केमिकल लोचा झाला होता...


मला असा प्रश्न पडतो की असा केमिकल लोचा साला आपल्याला का नाही होत?.. पूर्ण इंजीनियरिंग गेली कितीतरी पुस्तक वाचले, कितीतरी नोट्स काढल्या पण कधीही अस नाही वाटल की एका वेळी ज्यानी लिहिलेले पुस्तक होते तो फ़क्त आपल्यालाच दिसत आहे.


आता पर्वचाच किस्सा घ्या... काय झाल की मी एक ब्लॉग article वाचायला घेतला की एक माणुस पुस्तक वाचता वाचता स्वप्नात गेला आणि तिथे त्याला कोणीतरी पुस्तकातला author दिसायला लागला. मग त्याने जे काही कर म्हटले तो हा माणुस करायला लागला आणि मग त्याला आयुष्यात पुढे जाण्याची स्पुर्थी भेटली. जेव्हा तो स्वप्नातून बाहेर आला ते सर्व विचार मनामधे थैमान मांडू लागले म्हणुन त्याने ते विचार आचरणात आणण्याचे ठरवले. आता तोच माणुस एका मोठ्या पदावर काम करत आहे.


अजुन एक अस की काम करता करता आपल्याला स्वप्नात मेनेजर दिसायला लागला तर नवल वाटायला नको. एक अशीच गोष्ट वाचली,

एका माणसाला एकदा स्वप्न पड़त की तो विमानत प्रवास करत आहे, आणि एयर होस्त्रेस ही त्याची बाल्मैत्रिन जी खुप दिवसा  नंतर भेटली. तो तिला बोलू पाहतो तेवढ्यात ती त्याला अड़वते आणि नंतर बोलू अस म्हणते आणि स्वतः च नंबर त्याला एक चिट्ठी वर लिहून देते.  हा फार खुश होतो, आनंदाने प्रवासाची मजा घेत असतो. त्या मुलीबरोबर खुप दिवसानी मनसोक्त बोलूया आणि आपला वेळ चांगला जाईल असा विचार करुन तो बसलेला असतो तेवढ्यात विमान हलायला लागते, आधी कधी पण त्याने अशी स्थिति अनुभवली नसते. विमान अजुन जोर जोरात हलायला लागते, मग त्याला जाग येते तेव्हा त्याला समजते की त्याचा मेनेजर त्याला डेस्क वरून झोपेतून उठवत असतो. आता ह्याला केमिकल लोचा नाही तर काय म्हन्णार?? :)

काही काही लोकांच्या मनात तर अश्या व्यक्ति येतात की ज्या ह्या जगात कधी अस्तित्वातच नव्हत्या...


राजकुमार हिरानी हा माणूस असे नविन नविन विचार कसे करू शकतो?... तो जीवनातल्या साध्या साध्या गोष्टी विचारत घेउन त्याना चांगला मसाला टाकुन चांगल्या प्रकारे कश्या मांडता येतील असेच करतो मग आपण का नाही असा विचार करत??...


एका प्रकारे ही एक फारच छान गोष्ट आहे असे आपण म्हणू शकतो. विचार मनात कोणतेही येओत  पण त्याना एक दिशा मिळून ते चांगल्या मार्गी लागणे  महत्त्वाचे...मुन्ना भाई ला बापुनी त्याच्या विचारंचिच चांगली ओळख करुन दिली.... मुन्ना भाई कितीही वाईट गोष्टी करत असला तरी तो मनातून चांगला होता आणि त्याचे विचारच चांगले होते...


कधी कधी मला मनामधे वाटते की का नाही आपण पण तीन तीन दिवस बसून एखाद पुस्तक वाचाव त्या गोष्टीत पूर्णपणे सामाउन जाव आणि मग आपल्याला पण बापू किवा तो मोठा माणुस दिसायला लागेल... पण नंतर लगेच लक्षात येत की आपण इंजिनियर आहोत आणि अस logic नसलेली गोष्ट पचवण फार अवघड काम आहे...  

असे केमिकल लोचे होतात म्हणुन तर आपल्याला नविन नविन विचार करण्याची चालना मिळते.. नाहीतरी आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात कोण एवढ्या गोष्टींचा विचार करतो?? आजच्या युगात गरज आहे सर्वांच्या डोक्यात केमिकल लोचा होण्याची. at लीस्ट थोडा चांगुलपणा या युगाला सुधारू शकेल, असे bomb ब्लास्ट, कसाब सारखे लोक, दंगे, मारामारी, पैस्या साठी होणारे भांडण, भ्रष्टाचार, अजुन खुप साऱ्या वाईट गोष्टीवर पूर्णविराम बसेल आणि आपला भारत स्वयंभू महासत्ता बनेल..

Thursday, November 11, 2010

अगणित आयुष्य…

आयुष्याचे गणित कधीच मांडता येत नाही 
ज्याला ते आले तो आयुष्य जगत नाही 

आयुष्याच्या वाटेवर काटे असतात खूप 
काट्यातून वाट काढून जाणारा अनुभवतो सुख 

शिक्षा मिळते कुकर्मांची सर्वानाच 
चांगले काम करणारे फारच कमी भेटतात आयुष्यात 

आयुष्याचे गणित हे एक चक्रव्युव आहे  
बाहेर निघणारा फ़क्त अर्जुनच आहे  

असतात काही अभिमन्यु फ़क्त मधे जाणारे 
बाहेर येण्याची धुसरशिही जाण नसणारे  

वाचून राहावे प्रत्येक क्षणी आयुष्यात 
काय माहित कोण कधी सोडून जाईल आपली साथ 

प्रत्येक पायरी शिकवते गणित पूर्ण समजायला  
प्रत्येक चुकलेली पायरी भरकटवते आयुष्याला    

काही पाय-या चुक्लेल्याच चांगल्या असतात 
आयुष्याचे गणित तुटक फूटक मांडायला शिकवतात   

आयुष्य तसे अगणितच    
लागते त्याला खुप पाय-यांची जोड़  
आधी गणित मांडायला शिक 
आणि बाकी सगळ सोड...

पुन्हा त्याच वेळेची आठवण येत आहे ….

दिवस  गेला  कि  नवीन  आठवण  येते 
जुन्या  दिवसाची  अपेक्षा  कमी  होते 
नवीन  दिवस  नेहमीच  येतात  
पण  पुन्हा  त्याच  वेळेची  आठवण  येत  आहे …

महासागराची  भीती  सर्वांनाच  वाटते 
वेळ  आली  कि  ती  पण  क्षणात  कमी  होते ..
तीच  भीती  आता  वाढत  आहे …
म्हणूनच  पुन्हा  त्याच  वेळेची  आठवण  येत  आहे ….

आता  office मध्ये  पण  कामात  चिडचिड  होते ..
कामामुळे   सगळी   वेळ   खोटी   होते 
पण  चांगली  वेळ  येण्याची  वाट पाहावी लागते  
त्यामुळे  पुन्हा  त्याच  वेळेची  आठवण  येत  आहे

चहाच्या  टपरी  वरच  चहाची  मजा  येते ..
पोळी  भाजी   तर  आईच्या  हातचीच  चांगली  वाटते ..
आता  पोळी  भाजी  आणि  चहा ची   मजा   विरळत  आहे 
आणि त्यामुळेच  पुन्हा  त्या  वेळेची  आठवण  येत  आहे …

वाघ  सिह  जंगलात  राजे  असतात 
पिंजर्यात  त्यांची  राजेशाही  चालत  नसते …
घर  आपले  नसले  कि  मन  लागत  नसते 
तरीच  पुन्हा  त्याच  वेळेची  आठवण  येत  असते …

चित्रातल्या  प्रतिकृती   वास्तव्यात  कधी  येत  नसतात   
त्या  कलाकाराच्या  मनातल्याच  असतात 
पण  त्या  मनात  वास्तव्यातूनच  गेलेल्या   असतात
ती  वेळ  पुन्हा  मला  आवाज  देत  आहे …

म्हणूनच  त्या  वेळेची  आठवण  येत  आहे …
म्हणूनच  त्या  वेळेची  आठवण  येत  आहे …

ती  वेळ  कोणती?  हा  मोठा  प्रश्न  तुमच्या  मनात  असेल 
त्या  वेळी  सगळ्या  गोष्टी  चांगल्या  असतील  
त्या  वेळी  सगळ्या  इच्छा  पूर्ण  झालेल्या  असतील 
पण  अशी  वेळ  खराब   अनुभव  नंतरच  आली  असते …

म्हणूनच  प्रत्येक  वेळ  हि  पाहिजे  तीच  वेळ  आहे  …
आणि  त्याच  वेळेची  पुन्हा  पुन्हा  आठवण  येत  आहे …