Wednesday, December 8, 2010

एक चाळ... भाग ३


चिंटया ला आठवले की जेव्हा तो वर्गात जात होता तेव्हा त्याने सलीम उर्फ़ छोटा चित्रेश आणि शेरू उर्फ़ मांजा भाई ला पाहिले होते त्याने  या दोन गुंडांबरोबर अजुन  एक चेहरा पाहिला होता पण त्याला तो  आठवत नव्हता... 

चिंटया च्या वडलानी म्हणजे सदाभाऊ नी पण त्याला पाहिले होते...त्याचा चेहरा फारच ओळखीचा वाटत होता... 

इंस्पेक्टर शिंदे सर्व विचारत होते तेवढ्यात खरे काका डोक्याला हात लाऊन म्हणाले " का ह्या अत्र्यानी खोली सोडली? मगच हे सर्व विपरीत घडल ..."

"बरोबर आहे खरे काका त्यानीच हे केल आहे.." चिंटया म्हणाला 

"काय बोलत आहेस चिंटया?" खरे काकानी विचारले..

"अहो काका मी सलीम आणि शेरू बरोबर ज्या माणसाला पाहिल होत तो राजेश होता..." चिंटया उत्तरला...

सर्वांची तोंडे आ वाचून उभी राहिली कारण हां तर सर्वात मोठा धक्का होता...राजेश तर चांगल्या घरातला चांगला मुलगा होता तो असे काम का करेल बर?? सर्वांच्या मनात हाच प्रश्न होता ...

मग इंस्पेक्टर शिंदे नी चिंटयाच्या आणि सदाभाऊच्या मदतीने  सलीम आणि शेरू च्या खोली चा शोध घेतला...

पोलिसांनी trap लाउन सलीम ला पकडले पण शेरू त्या खोलीच्या मागच्या दरवाजातून पसार झाला... इंस्पेक्टर शिंदे नी त्याचा पाठलाग केला आणि शेवटी त्याला पकडले...

राजेश च्या घराचा पत्ता तर सदाभाऊना माहितच होता... राजेशही पकडला गेला...

त्याला केलेल्या तपासात हे निश्पन्न झाले की बेरोजगारी च्या फंद्यातून बाहेर येण्यासाठी त्याने सलीम आणि शेरू ची साथ दिली..

आपले घर जिथे जास्त लोक्वस्ती आहे ते देउया ज्याने तिथे दहशत माजेल असे कारस्थान होते छोटा चितेश आणि मांजा भाई चे....

चिंटया आणि चाळीतल्य़ा सर्वांचे इंस्पेक्टर शिंदेनी आभार मानले आणि ५ लाख रोख बक्षिस चाळीला भेटव्हून दिले... 

घरमालकाला अटक झाल्याने  त्याची बायको चाळी ची मालकिन झाली आणि तिने त्या ५ लाखाच्या बक्षिसाचा चांगला वापर केला...

सर्व चाळ नवी नवेली करुन टाकली... सर्व घराना रंग दिला, पाण्याचा मोठा प्रश्न दूर केला..

आता सदाभाऊना चिंटया वर फार गर्व वाटतो... त्यानी चिंटया च्या वर्गाची फीस पण पूर्ण भरली...
आता कोणीही tanker ची वाट पाहत नाही... 
आता कोणी पण चाळी ला धोक्यात जाऊ देत नाही... सर्व जण गुण्या गोविंदाने रहातात..

वाचल्याबद्दल धन्यवाद,
निखिल जोशी...
ही गोष्ट लिहिन्यामागे माझा मित्र रवि याचा मोठा हात आहे त्याने मला ह्या विषयाबद्दल लिहिण्यास स्पूर्ति दिली..

Monday, December 6, 2010

एक चाळ... भाग २

चिंटया जसा ओरडला सर्वांच्या छातीत धस्स झाल.. मग काय सर्व लोक जिकडे तिकडे पळत सुटले..तिथे खरच बॉम्ब आहे का नाही याची शहानिशा न करताच सर्व जण भाम्भावले...

आता काय करायच कुठे जायच? आधीच मुंबईत  एवढे बॉम्ब ब्लास्ट होत आहेत आता आपण पण त्याच्या आहारी जाणार का? असे प्रश्न सर्वांच्या मनात थैमान मांडत होते... जो तो इकडे तिकडे पळत सुटला होता... चिंटया तर सर्वांच्या पुढे पळत होता...

शेवटी सर्व जण अंगणात जमा झाले...सदाभाऊनि पोलिसाना फ़ोन केला .. पोलिस अर्ध्या तासात हजर झाले...त्यानी घरमालकाला बोलावले आणि विचारले की ह्या दोघाना इथे राहू देण्या आधी ते कुठून आले आहेत याची पड़ताळणी का नाही करुन पाहिली?

खरे काका ओरडले " अरे पैसे भेटल्यावर कोण काय पाहतो? कोणाला वेळ आहे तेवढा? ह्याला पण खाऊ घातले पैसे आणि ह्याला तर पैसे सोडून दुसर काय पाहिजे?"

सदाभाऊनि  पण मध्यस्ती करुन पोलिसाना हे समजाउन सांगीतल की ह्या दोघांची काहीच ओळख नव्हती तरीही घरमालकाने कसे त्याना ठेउन घेतले वगैरे वगैरे...

इंस्पेक्टर शिंदेनी चांगलीच विचार्फुस केली... आणि शेवटी त्यानी घरमालकाला ताब्यात घेतले.. हा पुन्हा सर्वाना धक्का देणारा प्रसंग घडला होता...

इंस्पेक्टर शिंदेनी बॉम्ब squard ला बोलावले आणि बॉम्ब defuse करायला सांगितले..

बॉम्ब defuse झाला आणि सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला...

पोलिसांनी कसून तपास केला... त्या तपासात असे निष्पन्न झाले की सलीम आणि शेरू च्या घरात १०० किलो RDX  आहे आणि... बॉम्ब बनवण्याचे साहित्य... ५० लाख रुपये रोख....

हे ऐकून खरे काकाना तर जवळपास हार्ट attak च आला होता...

सलीम आणि शेरू हे दोघे मोठे गुंड होते छोटा चित्रेश आणि मंजा भाई...

त्यानी हां सगळा प्लान बनवला होता ज्यानी सगळी चाळ बॉम्ब ने उडून जाईल आणि दहशत माजेल...

ह्या प्लान मधे घरमालक पण सामिल होता... घरमालकाला १० लाख रुपये मिळाले होते ज्यानी की तो ही सगळी चाळ उडवून टाकुन सगळी जमीन एक मॉल बांधणा-या माणसाला विकणार होता...

त्यांचा हां सगळा प्लान चिंटयाने आणि त्याच्या छोट्या मित्रानी चांगलाच फसवला... 

इंस्पेक्टर शिंदेनी या सर्व गोष्टीना पकडून दिल्या बद्दल चाळीतल्य़ा लोकाना २ लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले...

तरीही एक गोष्ट राहिलीच होती... छोटा चित्रेश आणि मंजा भाई ला कस पकडायच?? 

सदाभाऊ जिथे ड्राईवर चे काम करत होते, तिथे त्यानी एकदा सलीम ला पाहिले होते... चिंटया ला वर्गात सोडायला जाताना त्यानी सलीम ला पाहिले होते... 

सलीम आणि शेरू चिंटया च्या वर्गालगत एका खोलीत रहात होते...

लगेच चिंटया च्या डोक्यातला दिवा पेटला...

क्रमशः...

Shyamchi Aai (Marathi)                                                            

Sunday, December 5, 2010

एक चाळ... भाग १

नमस्कार.. या गोष्टितिल सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहेत आणि त्यांचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्ति शी तीळमात्रही संबंध नाही..

चाळ हे नाव समोर आल्यावर आपल्याला एका तीन ते चार मजली इमारतीत शंभर खोल्या आणि प्रत्येक खोलीत राहाणारे एक कुटुंब असे चित्र मनात येते...या गोष्टीत पण तेच चित्र आणि त्यातल्या घटना थोड्या वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे...

"चिंटया, दरवाज्यातून सकाळ पेपर आण रे, साला हे इलेक्शन पुन्हा तोंडावर आलेत काय होणार ए कुणास ठाउक?", सदाभाऊ ओरडले...

"अहो बाबा त्या इलेक्शन च काय घेउन बसलात, माझ्या शाळएची फी भरायची आहे त्याच बघा काहीतरी.", चिंटया रागाने उत्तरला...

"कारटया बापाला शिकवतोस? चल मधल्या खोलीत जा..." सदाभाऊ चिडून म्हणाले, "साले आजचे कारटे फारच माजले आहेत"..

सकाळ ची वेळ होती सर्व बायका चाळी समोर आणि आपल्या अंगणा समोर झाड़ू मारून सडा टाकत होत्या. पाण्याचा Tanker आला होता आणि रांग लाउन सगळ्यानि पाणी भरले होते..


काही बदमाष कार्टी आपला नंबर लवकर लागावा म्हणून पाणी भरणारया आज्जीना घरी फ़ोन आला आहे असे सांगुन घरी पाठवत होते आणि रांगेत समोर जात होते... 

सगळी माणसे सकाळी सकाळी पेपर वाचत आणि चहा पीत सरकारी गोष्टिंबद्दल गूढ़ चर्चा करत बसले होते..

राजेशला चांगली नोकरी लागली होती नवी मुंबई मधे म्हणुन अत्रे फॅमिली चाळ सोडून जाणार होती...

"राजू अरे कधी आवरणार सगळ?? जायला उशीर होतो आहे रे.." राजेशची आई म्हणाली..

"अग हो आई सगळ बांधून ठेवल आहे लवकरच निघू"  राजेश म्हणाला..

मोठा  ट्रक  चाळीत आला आणि त्यात राजेशने बांधून ठेवलेले सर्व पोते टाकले. चाळीत चर्चा चालू झाली की कोण येणार अत्र्यांच्या खोलीत रहायला?.. तेवढ्यात घरमालक आला आणि त्यानी अत्र्यांची खोली दोन कॉलेज च्या दिसणा-या  तरुणाना दिली...

खरे काका नि विचार्फुस करावी म्हटल आणि ते त्या दोघांकडे गेले...

"का रे मुलांनो तुमचे नाव काय आहेत? आणि तुम्ही काय करता?" खरे काकानी विचारले   

"मी सलीम आणि हा शेरू.. आम्ही कॉलेज मधे आहोत काका!!" सलीम म्हणाला.

थोड्या वेळ सर्व विचार्फुस करुन खरे काका गेले.. त्यानी ती बातमी सर्व चाळीत पसरवली..सलीम आणि शेरू दोघेही गुंड होते असे प्रथम दर्शनी दिसत होते... तरीही घरमालकाने त्याना राहण्यासाठी जागा कशी काय दिली असा मोठा प्रश्न सर्वांच्या मनात आला होता....

मग संगंमतानी सर्वानी निर्णय घेतला की जास्त पैसे खाऊ घातले असतील मग काय कोणीही घरमालक थोडेच मागे पुढे पाहतोय... ते दोघे अत्र्यांच्या खोलीत राहू लागले ... कधीही यायच कधीही जायच. काहीही करायच .. चाळी तले सर्व लोक फारच त्रस्त झाले होते .. सर्व जण फारच रागात आले होते ...

सर्वानी ठरवले की ह्याची तक्रार घरमालकाकडे करावीच लागेल...

सर्व छोटी मंडळी एकत्र आली आणि त्यानी सलीम आणि शेरू च्या खोलीतल्या खिडकीतुन डोकाउन पाहिले... आणि चिंटया जोरात ओरडला "अरे बॉम्ब आहे त्यांच्या घरात!!! "

क्रमशः...