चिंटया जसा ओरडला सर्वांच्या छातीत धस्स झाल.. मग काय सर्व लोक जिकडे तिकडे पळत सुटले..तिथे खरच बॉम्ब आहे का नाही याची शहानिशा न करताच सर्व जण भाम्भावले...
आता काय करायच कुठे जायच? आधीच मुंबईत एवढे बॉम्ब ब्लास्ट होत आहेत आता आपण पण त्याच्या आहारी जाणार का? असे प्रश्न सर्वांच्या मनात थैमान मांडत होते... जो तो इकडे तिकडे पळत सुटला होता... चिंटया तर सर्वांच्या पुढे पळत होता...
शेवटी सर्व जण अंगणात जमा झाले...सदाभाऊनि पोलिसाना फ़ोन केला .. पोलिस अर्ध्या तासात हजर झाले...त्यानी घरमालकाला बोलावले आणि विचारले की ह्या दोघाना इथे राहू देण्या आधी ते कुठून आले आहेत याची पड़ताळणी का नाही करुन पाहिली?
खरे काका ओरडले " अरे पैसे भेटल्यावर कोण काय पाहतो? कोणाला वेळ आहे तेवढा? ह्याला पण खाऊ घातले पैसे आणि ह्याला तर पैसे सोडून दुसर काय पाहिजे?"
सदाभाऊनि पण मध्यस्ती करुन पोलिसाना हे समजाउन सांगीतल की ह्या दोघांची काहीच ओळख नव्हती तरीही घरमालकाने कसे त्याना ठेउन घेतले वगैरे वगैरे...
इंस्पेक्टर शिंदेनी चांगलीच विचार्फुस केली... आणि शेवटी त्यानी घरमालकाला ताब्यात घेतले.. हा पुन्हा सर्वाना धक्का देणारा प्रसंग घडला होता...
इंस्पेक्टर शिंदेनी बॉम्ब squard ला बोलावले आणि बॉम्ब defuse करायला सांगितले..
बॉम्ब defuse झाला आणि सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला...
पोलिसांनी कसून तपास केला... त्या तपासात असे निष्पन्न झाले की सलीम आणि शेरू च्या घरात १०० किलो RDX आहे आणि... बॉम्ब बनवण्याचे साहित्य... ५० लाख रुपये रोख....
हे ऐकून खरे काकाना तर जवळपास हार्ट attak च आला होता...
सलीम आणि शेरू हे दोघे मोठे गुंड होते छोटा चित्रेश आणि मंजा भाई...
त्यानी हां सगळा प्लान बनवला होता ज्यानी सगळी चाळ बॉम्ब ने उडून जाईल आणि दहशत माजेल...
ह्या प्लान मधे घरमालक पण सामिल होता... घरमालकाला १० लाख रुपये मिळाले होते ज्यानी की तो ही सगळी चाळ उडवून टाकुन सगळी जमीन एक मॉल बांधणा-या माणसाला विकणार होता...
त्यांचा हां सगळा प्लान चिंटयाने आणि त्याच्या छोट्या मित्रानी चांगलाच फसवला...
इंस्पेक्टर शिंदेनी या सर्व गोष्टीना पकडून दिल्या बद्दल चाळीतल्य़ा लोकाना २ लाख रुपयांचे बक्षिस जाहिर केले...
तरीही एक गोष्ट राहिलीच होती... छोटा चित्रेश आणि मंजा भाई ला कस पकडायच??
सदाभाऊ जिथे ड्राईवर चे काम करत होते, तिथे त्यानी एकदा सलीम ला पाहिले होते... चिंटया ला वर्गात सोडायला जाताना त्यानी सलीम ला पाहिले होते...
सलीम आणि शेरू चिंटया च्या वर्गालगत एका खोलीत रहात होते...
लगेच चिंटया च्या डोक्यातला दिवा पेटला...
No comments:
Post a Comment